मणिपूरमध्ये लवकरच नवीन सरकार   

भाजप आमदाराचा दावा

इंफाळ : मणिपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेत बरीच सुधारणा झाली असून राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असे भाजप नेते टी. रोबिन्द्रो यांनी सांगितले.मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट  लागू आहे. मैतेई आणि कुकी गटांमध्ये शांतता चर्चा सुरू झाली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही गटाच्या आमदारांमध्येही बोलणी होईल, असेही ते म्हणाले. थांगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे रोबिन्द्रो पुढे म्हणाले की, आमच्यामध्ये (भाजप आमदार) नेता  निवडीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्व एक आहोत. आम्ही मणिपूरचे विभाजन होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही एकजुटीने उभे राहू. मे २०२३ पासून इंफाळ खोर्‍यातील मैतेई आणि डोंगराळ भागातील कुकी समुदायात वांशिक हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २६० हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.मध्यंतरी, तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ९ फेब्रुवारी रोजी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, चार दिवसांनी लागलीच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 

Related Articles